महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे

NATIONAL MEANS cum MERIT SCHOLARSHIP EXAMINATION
2017-18

NMMS Exam Nov-2017 Results
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) 2017-18
निवड प्रक्रिया -
1. NMMS परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्यासाठी 11,682 शिष्यवृत्ती कोटा M.H.R.D. नवी दिल्ली यांचेकडून निश्चित केला आहे.
2. महाराष्ट्र राज्याच्या आरक्षणानुसार संबंधीत संवर्गातील विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते.
3. तसेच संबंधित संवर्गात अपंगांसाठीचे ३% आरक्षण समाविष्ट आहे.
4. सर्व जिल्हयांसाठी स्वतंत्रपणे इ. ७ वी व इ. ८ वी ची विद्यार्थी संख्या व १२ ते १४ वयोगटातील संख्या यांच्या आधारे जिल्हानिहाय कोटा निश्चित करण्यात आलेला आहे.
5. प्रत्येक जिल्हयासाठीचा कोटा खालील प्रमाणे निश्चित करण्यात आलेला आहे.
1. प्रथम गुणानुक्रमाने सर्वसाधारण (General) संवर्गातील पात्र विद्यार्थांची निवड केली जाते. उत्तीर्णतेसाठी ४०% गुण आवश्यक आहेत.
2. उर्वरित ८ संवर्ग तसेच सर्व अपंग विद्यार्थ्यांसाठी उत्तीर्ण होण्यासाठी ३२% गुण आवश्यक आहेत.
3. त्यानंतर गुणानुक्रमे आलेल्या विद्यार्थांचा त्या त्या (8) विशेष संवर्गातील विद्यार्थ्यांच्या यादीत समावेश केला जातो.
4. विशेष संवर्गातील यादी करताना त्या संवर्गतील सर्वसाधारन यादीतील विद्यार्थी संख्या विचारात घेतली जात नाही.
5. प्रत्येकी नऊ संवर्गातील अपंगासाठी एकूण ३% आरक्षण देण्यात येते. अस्थिव्यंग (Orthopedic Disable ), कर्णबधीर (Hearing Disable), दृष्टीक्षेप (Visually Disable) / अंध (Blind) या प्रत्येकी प्रवर्गासाठी १% आरक्षण स्वतंत्रपणे देण्यात आले आहे.
6. अपंगांसाठीचे आरक्षण निश्चित करताना त्या संवर्गात प्रथम उपलब्द विद्यार्थी संख्येचा विचार करण्यात येतो. ३% आरक्षण पूर्तता होत नसेल तर गुणवत्ता यादीतील आवश्यक तेवढ्या शेवटच्या क्रमांकाऐवजी अपंग आरक्षण संधी गुणानुक्रमे दिली जाते.
7. सर्व संवर्गामध्ये अस्थिव्यंग,कर्णबधीर आणि दृष्टीव्यंग / अंध या प्रवर्गाना समान संधी देण्यात येते. सर्व प्रवर्गातून अपेक्षित विद्यार्थी संख्या प्राप्त न झाल्यास गुणानुक्रमे इतर प्रवर्गातील उपलब्द विद्यार्थातून निवड केली जाते.
8. फक्त २ अपंग विद्यार्थांचा कोटा असताना वेगवेगळ्या ३ प्रवर्ग गटातील गुणानुक्रमे दोन प्रवर्गातील विद्यार्थांची निवड करण्यात येते.
6. शेवटच्या दोन किंवा अधिक विद्यार्थांना सारखे गुण असल्यास खालील क्रमाने प्राध्यान्यक्रम निश्चित करण्यात येतो.
1. ज्याचे गुण MAT विषयामध्ये जास्त आहेत असा विध्यार्थी.
2. ज्याचे गुण SAT विषयातील गणित या विषयात जास्त आहेत असा विध्यार्थी.
3. वरील १ व २ मध्ये समान गुण असल्यास विज्ञान विषयातील जास्त गुण आहेत असा विद्यार्थी.
4. MAT व SAT मधील गणित व विज्ञान विषयातील समान गुण असल्यास ज्याचे वय जास्त आहे असा विद्यार्थी.
5. विद्यार्थांचे वय समान असल्यास आडनावाच्या इंग्रजी अद्याक्षरानुसार. आडनाव नसणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार सर्वात शेवटी करण्यात येतो.
7. मा. शिक्षण संचालक, (माध्यमिक व उच्च माध्यमिक) मध्यवर्ती इमारत, पुणे-१. यांच्यामार्फत निवड झालेल्या विद्यार्थांना शिष्यवृत्तीचे वाटप केले जाते.
इ.८ वी साठी परीक्षा दि. ०३ डिसेंबर २०१७ गुणयादी बाबत सूचना....
1) राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेची गुणयादी दि.१९/०५/२०१८ रोजी परिषदेच्या www.mscepune.inhttp://nmms.mscescholarshipexam.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे.
2) सदर यादीमध्ये विध्यार्थ्याच्या नावात, जातीत, दिव्यंगत्वात (अपंगत्वात) व इतर काही दुरुस्ती/ हरकती असल्यास तसेच निकालामध्ये काही दुरुस्ती/ हरकती असल्यास शाळेमार्फत परिषदेच्या nmms.msce@gmail.com या ईमेलवर दि. २५/०५/२०१८ पर्यंत कळविण्यात यावे. त्यानंतर विहित मुदतीनंतर आलेल्या दुरुस्त्यांचा विचार करण्यात येणार नाही.
3) आलेल्या सर्व दुरुस्त्यांचा विचार करून शिष्यवृत्तीसाठीची निवडयादी परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश जाहीर करण्यात येईल.
4) शिष्यवृत्तीसाठीची निवडयादी जाहीर झाल्यानंतर निवडयादीत कोणताही बदल करण्यात येणार नाही.
5) सदर परीक्षेसाठी उत्तीर्ण होण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे गुण मिळणे आवश्यक आहेत.

MAT विषयातील प्रश्न क्र.18,38 व 66 हे प्रश्न रद्द करण्यात आलेले आहेत .

अ. क्र. विषय प्रश्न संख्या पात्रता गुण
General SC/ST/VJ/NTB/NTC
/NTD/OBC/SBC व अपंगासाठी
बौद्धिक क्षमता चाचणी Mental Ability Test (MAT) ९७* ४०% (३९ गुण) ३२% (३१ गुण)
शालेय क्षमता चाचणी Scholastic Aptitude Test (SAT) १०० ४० %(४० गुण) ३२% (३२ गुण)
एकूण = १९७ ४०% (७९ गुण) ३२% (६३ गुण)
Enter Correct Seat Number

or


Show ResultDistrict-wise Caste-wise Merit List